अखंड सेवा, सक्षम नागरिक

आमची यशोगाथा

🏡 गावाची प्राथमिक माहिती – कलमठ, कणकवली

कलमठ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक अग्रेसर ग्रामपंचायत आहे. गावाने प्रशासन, विकास आणि सामाजिक सलोखा यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.

📊 लोकसंख्या व घरगुती माहिती
- 2011 च्या जनगणनानुसार लोकसंख्या: 8011
- 2025 साली अंदाजे लोकसंख्या: 10280
- एकूण घरांची संख्या: 2061
- एकूण कुटुंबे: 1929
- गावाचे क्षेत्रफळ: 25.5 चौरस कि.मी.

🛕 धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये
कलमठ हे सर्वधर्मीय एकतेचे प्रतीक आहे. येथे विविध धार्मिक स्थळे आहेत:
- ग्रामदैवत: श्री कलेश्वर
- इतर मंदिरे: विविध हिंदू देवतांची मंदिरे
- मशीद: मुस्लिम समाजासाठी उपासना स्थळ
- बुद्धविहार: बौद्ध समाजासाठी शांततेचे केंद्र

🌱 सामाजिक व सांस्कृतिक सलोखा
गावात सर्वधर्मीय नागरिक एकत्रितपणे सण, उत्सव आणि सामाजिक उपक्रम साजरे करतात. ग्रामपंचायतच्या नेतृत्वाखाली विविध विकास योजना राबविल्या जातात.

प्रगतीच्या वाटेवर - कलमठ गाव

ग्रामपंचायत कलमठ ही शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अग्रेसर ठरली आहे. विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे मा. पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वारंवार भेट देऊन पाहणी करत ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले आहे. ♻️ स्वच्छतेचा आदर्श ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दररोज ओला व सुका कचरा विलगीकरण करून संकलन केले जाते. प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व प्रक्रिया सुरू असून, ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत चांगली जनजागृती निर्माण झाली आहे. 👩‍🩱 महिलांसाठी उपक्रम किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन व सॅनिटरी पॅड एटीएम कार्ड यांचे वितरण करण्यात आले आहे. 🚰 पिण्याच्या पाण्याची सुविधा गावातील सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी वॉटर एटीएम पोलिस स्टेशनजवळ सुरू करण्यात आले आहे. 🎓 शिक्षणातील डिजिटल पाऊल शासनाच्या धोरणानुसार सर्व शाळांना CCTV जोडणी तसेच इंटरनेट सुविधा ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 🏢 प्रशासनातील पारदर्शकता “आपले सेवा केंद्र” ची कायम नोंदणी करून विविध शासकीय दाखले ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कलमठ ही अशी सुविधा देणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असून, आतापर्यंत सुमारे 220 दाखले वितरित करण्यात आले आहेत. 🎯 विद्यार्थी विकास शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीत समर कॅम्प आयोजित केला जातो, ज्यामध्ये मुलांना विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद घेता येतो. 💻 तंत्रज्ञानाचा वापर आर्थिक वर्ष 2025-26 पासून विविध करांची QR कोडद्वारे वसुली सुरू करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचाऱ्यांना AI तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन दैनंदिन कामकाजात त्याचा वापर सुरू आहे. 🛕 ग्रामदैवत मंदिर विकास ग्रामदैवत श्री देव कशी कलेश्वर मंदिर येथे शासनाच्या योजनेतून सुसज्ज व निसर्गरम्य गार्डन तयार करण्यात आले आहे. 🌟 कलमठ ग्रामपंचायतीचा निर्धार गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाचे नाव प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर ठेवणे — हाच कलमठ ग्रामपंचायतीचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


1929
8011
4018
3993

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo